मुंबई ः अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स (मुंबई) येथे २७ जून रोजी पार पडलेल्या २४ व्या आंतरराष्ट्रीय 'जीत कुने डो' चॅम्पियनशिप स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या 'महेंद्राज लॉयन्स स्पोर्ट्स अँड करिअर अकॅडमी'च्या खेळाडूंनी ऐतिहासिक आणि विलक्षण कामगिरी केली आहे. स्पर्धेत अकॅडमीच्या ९ खेळाडूंनी भाग घेतला होता आणि या सर्वांनी मिळून तब्बल ३ सुवर्ण, ५ रौप्य आणि १० कांस्य अशा एकूण १८ पदकांवर आपले नाव कोरले.
ग्लोबल वर्ल्ड स्पोर्ट्स जीत कुने डो फेडरेशन ऑफ इंडियातर्फे आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध स्टंट व मार्शल आर्ट्स डायरेक्टर डॉ. चीता यजनेश शेट्टी यांच्या हस्ते झाले. या वेळी जेकेडीचे चीफ टेक्निकल डायरेक्टर राजेंद्र कुमार व्होरा, नेपाळचे राजकुमार पर्साई, सरचिटणीस विजेंदर गोहार, 'मास्का'चे प्रकाश नकाशे आणि मार्शल आर्ट्स संघटक रफिक जमादार उपस्थित होते. या स्पर्धेत देश-विदेशातून १,५०० हून अधिक खेळाडू सहभागी झाले होते.
या विजेत्या खेळाडूंना अकॅडमीचे संचालक व मुख्य कोच महेंद्र रंगारी आणि रफिक जमादार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या अभूतपूर्व यशाबद्दल डॉ. शत्रुंजय कोटे, डॉ. मकरंद जोशी, डॉ. आर. व्ही. सिद्दीकी, डॉ. मीनाक्षी मुलिया आणि क्रीडाप्रेमींनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.
विजेते खेळाडू
गणेश टाक (१३ वर्षे): सुवर्ण (काता), रौप्य (कुमिते)
विहान अस्वार (१२ वर्षे): सुवर्ण (कुमिते), कांस्य (काता)
अदनान खान (१३ वर्षे): सुवर्ण (कुमिते), कांस्य (काता)
आरोही वाहूळ (१२ वर्षे): रौप्य (कुमिते), कांस्य (काता)
साधना हिवरगंड (१० वर्षे): रौप्य (काता), कांस्य (कुमिते)
श्लोक कोलते (१२ वर्षे): रौप्य (काता), कांस्य (कुमिते)
अथर्व मोरे (११ वर्षे): रौप्य (काता), कांस्य (कुमिते)
हर्षल गायकवाड (१३ वर्षे) व हर्षल कोरके (१२ वर्षे): प्रत्येकी २ कांस्य पदके (काता व कुमिते)